श्वासांशी माझ्या खेळणे तुझे,
अजून सलते,
गोठणाऱ्या वाऱ्यात जाळणे तुझे...!
रुसणे तुझे ते, क्षणांचा अबोला,
दुरावा तो झिजवी, चंद्राची कला,
अजून स्मरते,
क्षणात लडिवाळ हासणे तुझे,
चांदण्या रात्री,
श्वासांशी माझ्या खेळणे तुझे...!
भेटणे तुझे ते, हिरव्या रानी,
तान कोकिळेची, पडता कानी,
अजून जगते,
पाव्याच्या सुरांत हरवणे तुझे,
चांदण्या रात्री,
श्वासांशी माझ्या खेळणे तुझे...!
पाहणे तुझे ते, डोळ्यांत खोल
भुरळ ती वाटे, जाई तोल,
अजून टोचते,
तिष्ठवत नजर चोरणे तुझे,
चांदण्या रात्री,
श्वासांशी माझ्या खेळणे तुझे...!
अजून भासते,
रात्रींत माझ्या जागणे तुझे,
चांदण्या रात्री,
श्वासांशी माझ्या खेळणे तुझे...!
~ वर्षा
चांदण्या रात्री,