स्मृतिंचिया संग
रंगी तुझ्या रंग
शहारते अंग
अलवार...
विसरते भान
बसवेना पान
चाहुलीस कान
आसुसले...
डोळा माझे रूप
मन कासावीस
हारले कयास
सर्व आज...
ओल्या डोळ्यांसवे
विझताती दिवे
निद्रेच्या मी कवे
सापडेना...
क्रंदल्यासि मन
शब्दांचे हे मौन
जाणिल रे कोण
तुझ्याविना...
मनाचा तू ताज
श्रुंगाराचा साज
ओढ लावी आज
सूर्यासम...!!!
रंगी तुझ्या रंग
शहारते अंग
अलवार...
विसरते भान
बसवेना पान
चाहुलीस कान
आसुसले...
डोळा माझे रूप
मन कासावीस
हारले कयास
सर्व आज...
ओल्या डोळ्यांसवे
विझताती दिवे
निद्रेच्या मी कवे
सापडेना...
क्रंदल्यासि मन
शब्दांचे हे मौन
जाणिल रे कोण
तुझ्याविना...
मनाचा तू ताज
श्रुंगाराचा साज
ओढ लावी आज
सूर्यासम...!!!