मी म्हटलं, "अं हं..! तुला शब्दांत चितारण्याचा खुळा प्रयत्न, तुझ्यासारखी शब्दांची सांगड़ मला कुठे जमते. माझं इवलंस विश्व जाताना बेरंग करणारा तू, किमान माझ्या शब्दांत तरी रंग भरतोस...!"
~ वर्षा
काल स्वप्नात त्यानं विचारलं, "तू कविता लिहतेस?"
काल स्वप्नात त्यानं विचारलं, "तू कविता लिहतेस?"
मी म्हटलं, "अं हं..! तुला शब्दांत चितारण्याचा खुळा प्रयत्न, तुझ्यासारखी शब्दांची सांगड़ मला कुठे जमते. माझं इवलंस विश्व जाताना बेरंग करणारा तू, किमान माझ्या शब्दांत तरी रंग भरतोस...!" ~ वर्षा
0 Comments
सर एक अलगद मनात येते,
चिंब चिंब मज भिजउन जाते, मनाची कोकिळ सुरांत गाते, हळुच तुझी ती चाहूल देते...! बोल तुझे ते कानी पडता, मधास उगाचच इर्षा होते, ओठांची या कळी उमलते, मलाच मी जरा सावरते...! गोड आठवण रात्र सजवते, नयनी माझ्या रंग उधळते, ओंजळ नकळत मुख लपवते, झुळूक मंदसी ज्योत विझवते...! स्वप्न जरी हे भास सारे, दूर तरी तू जवळ मना रे, साक्ष तयाची देतील तारे, फुले, पाखरे नि सुगंधी वारे...! ~ वर्षा विरहात तुझ्या अश्रूंची या
अगणित फुले जाहली, प्रीत रेशमी धाग्यासम माळा गुंफत गेली... गंधाने तव श्वास भारले, स्पर्शाने तव रोम हर्षले.. शब्द तुझे ते रुसले सख्या, व्यर्थ माझी स्वराली...! मेघ निवळली, वर्षा सरली, वनात पाने-फुले बहरली. चकोर तृप्त-तृप्त मनी, कोकीळ भरते कुहू नवी, तुला उसंत न कशाची सख्या... व्यर्थ माझी स्वप्नाली...!! ~ वर्षा मेघ डोळ्यांत दाटती,
सख्या तुला आठवता.. स्वैर विखुरती गाली, बांध अनावर होता...! कळी ओठांची विझली, तुझा हात सोडवता... सुन्न मन होते का रे, व्यर्थ दिशा शोधता...! कान बधीर जाहले, तुझी साद ती विरेना... गोड लागतसे फिके, तुझी मिठास जाइना...! शब्द रुक्ष आज माझे, स्वर त्यांना का मिळेना... अर्थ त्यांचा आहे तूच, मला कळून पटेना...! चुके ठोका हा आजही, तुझे नाव काढताना... निशा जागते नयनी, स्वप्नी तुला पाहताना...! कैक दिवस रुसले कैक रात्र कण्हताना... तरी जळे मन रोज, दिव्या वात जळताना...! ~ वर्षा चांदण्या रात्री,
श्वासांशी माझ्या खेळणे तुझे, अजून सलते, गोठणाऱ्या वाऱ्यात जाळणे तुझे...! रुसणे तुझे ते, क्षणांचा अबोला, दुरावा तो झिजवी, चंद्राची कला, अजून स्मरते, क्षणात लडिवाळ हासणे तुझे, चांदण्या रात्री, श्वासांशी माझ्या खेळणे तुझे...! भेटणे तुझे ते, हिरव्या रानी, तान कोकिळेची, पडता कानी, अजून जगते, पाव्याच्या सुरांत हरवणे तुझे, चांदण्या रात्री, श्वासांशी माझ्या खेळणे तुझे...! पाहणे तुझे ते, डोळ्यांत खोल भुरळ ती वाटे, जाई तोल, अजून टोचते, तिष्ठवत नजर चोरणे तुझे, चांदण्या रात्री, श्वासांशी माझ्या खेळणे तुझे...! अजून भासते, रात्रींत माझ्या जागणे तुझे, चांदण्या रात्री, श्वासांशी माझ्या खेळणे तुझे...! ~ वर्षा |
माझ्याबद्दल मीच काही सांगायचं झालं तर... Archives
February 2015
Categories |