विरहात तुझ्या अश्रूंची या
अगणित फुले जाहली,
प्रीत रेशमी धाग्यासम
माळा गुंफत गेली...
गंधाने तव श्वास भारले,
स्पर्शाने तव रोम हर्षले..
शब्द तुझे ते रुसले सख्या,
व्यर्थ माझी स्वराली...!
मेघ निवळली, वर्षा सरली,
वनात पाने-फुले बहरली.
चकोर तृप्त-तृप्त मनी,
कोकीळ भरते कुहू नवी,
तुला उसंत न कशाची सख्या...
व्यर्थ माझी स्वप्नाली...!!
~ वर्षा
अगणित फुले जाहली,
प्रीत रेशमी धाग्यासम
माळा गुंफत गेली...
गंधाने तव श्वास भारले,
स्पर्शाने तव रोम हर्षले..
शब्द तुझे ते रुसले सख्या,
व्यर्थ माझी स्वराली...!
मेघ निवळली, वर्षा सरली,
वनात पाने-फुले बहरली.
चकोर तृप्त-तृप्त मनी,
कोकीळ भरते कुहू नवी,
तुला उसंत न कशाची सख्या...
व्यर्थ माझी स्वप्नाली...!!
~ वर्षा