आकाशात वर्दळ दगांची,
कानात गुणगुण वाऱ्याची...!
अंगणात सुळसुळ पानांची,
झुडुपांत किलबिल पक्षांची...!
बागेत तगमग मोराची,
मनात आठवण प्रियाची...!
बरसात हळुवार सरींची,
सरींत स्पर्धा अश्रूंची...!
गंधित काया धरणीची,
हृदयात साठवण श्वासांची...!
पाटात खळखळ पाण्याची,
शेतात लागवण पिकांची...!
हातात राखी बहिणीची,
घरात आरास बाप्पांची..!
कामात लगबग आईची,
ताटात पोळी पुरणाची...!
असा हा,
वर्षाऋतू....!!!
~ वर्षा
कानात गुणगुण वाऱ्याची...!
अंगणात सुळसुळ पानांची,
झुडुपांत किलबिल पक्षांची...!
बागेत तगमग मोराची,
मनात आठवण प्रियाची...!
बरसात हळुवार सरींची,
सरींत स्पर्धा अश्रूंची...!
गंधित काया धरणीची,
हृदयात साठवण श्वासांची...!
पाटात खळखळ पाण्याची,
शेतात लागवण पिकांची...!
हातात राखी बहिणीची,
घरात आरास बाप्पांची..!
कामात लगबग आईची,
ताटात पोळी पुरणाची...!
असा हा,
वर्षाऋतू....!!!
~ वर्षा