चिरते वीज आभाळी, लांब ढगांची रांग जशी,
शब्द तुझे मनाची माझ्या, करतात लाही तशी...
गळता फुल भूमीवरती, देठाची जशी,
विरहात तुझ्या मनाची माझ्या, व्यथा हि तशी...
जावया कुशीत आईच्या, बाळाची जशी,
तुझ्यासाठी मनाची माझ्या, ओढ हि तशी...
हंबरता वासरू गोठ्यात, गाईची जशी,
तुझ्यासाठी वाटे असावी, साद हि माझी तशी...
ढळता अश्रू डोळ्यांतून, हाताची जशी,
तुझ्या दिशेने मनाची माझ्या, धाव हि अगदी तशी...
वर्षता सरी पावसाच्या, चकोराची जशी,
दग्ध भग्न मनावर माझ्या, फुंकर तुझी तशी...
भिडतात स्वर हृदयाला, मंजुळ गाण्याची जशी,
शब्द माझे तुला स्पर्शावे, आर्त अपेक्षा अशी...!
~ वर्षा