कुशीत अलवार तुझ्या,
मन शिरले आज पुन्हा..
बासुरीच्या सप्तसुरांत तुझ्या,
मन गुंगले आज पुन्हा...!
घुंगराळ वाणीत तुझ्या,
मन दंगले आज पुन्हा...
मधाळ बोलांत तुझ्या,
मन रंगले आज पुन्हा...!
थरथरत्या ओठांवर तुझ्या,
मन हासले आज पुन्हा...
शब्दांच्या चकमकीत तुझ्या
मन स्तब्धले आज पुन्हा....!!!
अपूर्ण चित्रात तुझ्या,
मन हरवले आज पुन्हा..
बोलक्या डोळ्यांवर तुझ्या,
मन भाळले आज पुन्हा...!
पाउलांंच्या चाहुलीस तुझ्या,
मन भाकले आज पुन्हा..
गोड आठवणींत तुझ्या,
मन कष्टले आज पुन्हा...!
~ वर्षा
मन शिरले आज पुन्हा..
बासुरीच्या सप्तसुरांत तुझ्या,
मन गुंगले आज पुन्हा...!
घुंगराळ वाणीत तुझ्या,
मन दंगले आज पुन्हा...
मधाळ बोलांत तुझ्या,
मन रंगले आज पुन्हा...!
थरथरत्या ओठांवर तुझ्या,
मन हासले आज पुन्हा...
शब्दांच्या चकमकीत तुझ्या
मन स्तब्धले आज पुन्हा....!!!
अपूर्ण चित्रात तुझ्या,
मन हरवले आज पुन्हा..
बोलक्या डोळ्यांवर तुझ्या,
मन भाळले आज पुन्हा...!
पाउलांंच्या चाहुलीस तुझ्या,
मन भाकले आज पुन्हा..
गोड आठवणींत तुझ्या,
मन कष्टले आज पुन्हा...!
~ वर्षा