हासते फुलपाखरू फुलांवर जसे,
तू ये ना हळुवार ओठांवर तसे..
आभाळ सजते सांजेला जसे,
रुजू दे मनी या रंगांचे ठसे...!
~ वर्षा
तू ये ना हळुवार ओठांवर तसे..
आभाळ सजते सांजेला जसे,
रुजू दे मनी या रंगांचे ठसे...!
~ वर्षा
हासते फुलपाखरू फुलांवर जसे,
तू ये ना हळुवार ओठांवर तसे.. आभाळ सजते सांजेला जसे, रुजू दे मनी या रंगांचे ठसे...! ~ वर्षा
0 Comments
स्मृतिंचिया संग
रंगी तुझ्या रंग शहारते अंग अलवार... विसरते भान बसवेना पान चाहुलीस कान आसुसले... डोळा माझे रूप मन कासावीस हारले कयास सर्व आज... ओल्या डोळ्यांसवे विझताती दिवे निद्रेच्या मी कवे सापडेना... क्रंदल्यासि मन शब्दांचे हे मौन जाणिल रे कोण तुझ्याविना... मनाचा तू ताज श्रुंगाराचा साज ओढ लावी आज सूर्यासम...!!! हातात या हात तुझा
जेव्हा मज आठवला, तृण पात्याच्या निमित्ताने थेब एक ओघळला... "थांब जरा...!", क्षणास त्या मी हृदयातून या पुकारला, मुक्याच ओठी, जात्या पाठी, नेत्रांत तुज मग साठवला...! ~ वर्षा गुणगुणती एक झुळूक मंद
व्हावे तुझिया साठी, मळभ तुझे अलवार विरावे मम मनःसागरा काठी... सुमनगंध हा सदा दरवळो सख्या तुझ्या रे पाठी, अश्रूंची हि लाट सरो अन् नवनीत व्हाव्या गाठी... गीत आपुले मनात भरावे जणू पाखरू गाई, प्रेमांकुर हा नित्य खुलावा जशी अंगणी जाई... जवळ तुझ्या मी अशी असावे मुळांस जशी ती माती, तेवत तुझिया मनात राहू दे दिव्यांत जश्या त्या वाती...! ~ वर्षा सांज अशी ही येते
उसवती आठवांचे धागे, कोडे अजून न उलगडणारे जुळले कसे हे सागे... चांदणी रात्र कधीच सरली मळभ उगा हे दाटे, रात्रीची तो शान तरी मज चंद्र एकटा भासे... रोजचीच तरी अनोळखी हुरहूर मनात या जागे, सांग ना रे सख्या तुझ्याशी का असा हा लळा लागे...! ~ वर्षा |
माझ्याबद्दल मीच काही सांगायचं झालं तर... Archives
February 2015
Categories |