नेत्रांतूनच भाव मनीचे वेचू आपण,
मौनावरही मौन राहुनी बोलू आपण...
वाळूवरती गिरवू सारे किंतु नि पण,
ये नव्याने रुसवे सारे मिटवू आपण...!
निजलेले स्वप्न मनीचे जागवू आपण,
सुकलेली आस पुन्हा चल फुलवू आपण...
भातुकलीचा खेळ नव्याने मांडू आपण,
ये नव्याने जुने दुवेही विसरू आपण...!
फिरकून येऊ पुन्हा नव्याने जगात हव्याश्या,
नकोत सलत्या कसक नि चिंता अता नकोश्या...
ये गुलाबी गीत आशेचे गुंफू आपण,
धुंद प्रीतीचा सूर सोबती गवसू आपण...!
ये नव्याने रुसवे सारे मिटवू आपण,
मौनावरही मौन राहुनी बोलू आपण ...!!!
~वर्षा
मौनावरही मौन राहुनी बोलू आपण...
वाळूवरती गिरवू सारे किंतु नि पण,
ये नव्याने रुसवे सारे मिटवू आपण...!
निजलेले स्वप्न मनीचे जागवू आपण,
सुकलेली आस पुन्हा चल फुलवू आपण...
भातुकलीचा खेळ नव्याने मांडू आपण,
ये नव्याने जुने दुवेही विसरू आपण...!
फिरकून येऊ पुन्हा नव्याने जगात हव्याश्या,
नकोत सलत्या कसक नि चिंता अता नकोश्या...
ये गुलाबी गीत आशेचे गुंफू आपण,
धुंद प्रीतीचा सूर सोबती गवसू आपण...!
ये नव्याने रुसवे सारे मिटवू आपण,
मौनावरही मौन राहुनी बोलू आपण ...!!!
~वर्षा